मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड पुकारल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत पडले असून आता राजकीय लढाई सुरू झाली आहे. यातच आता दोन्ही गटात नव्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. यातच काल शरद पवार गटाची दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यातच यावेळी अजित पवार गटाकडून जयंत पाटलांवर मोठं भाष्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“..त्या दिवशी त्या गायब होत्या, संधीसाधू लोकं,” ठाकरे गटाने निलम गोऱ्हेंवर केली परखड टिका
३० जूनला राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्या बैठकीत अजित पवार यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं खळबळजनक खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. ३० जूनपासूनच्या घडामोडी निवडणुक आयोगाडकडे आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणतीही फूट नसून संख्याबळानुसार बहुमताने पक्ष अजित पवार यांच्या पाठिशी आहे. पक्ष म्हणून निवडणुक आयोगाकडे चिन्हाची मागणी केल्याचाही माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
हेही वाचा…राजकारणातून ब्रेक घेणार..! पंकजा मुंडेंच्या विधानावर फडणवीसांचं सुचक विधान, म्हणाले, “राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने..”,
नव्या नियुक्यांसाठी निवडणुक आयोगाला अर्ज दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार सर्व काही सुरू आहे. अजित दादांची निवड अध्यक्ष म्हणून झाली. तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती देखील पटेलांनी सांगितलं. जयंत पाटील अधिकृत प्रदेशाध्यक्ष नाहीत. त्यांनी आमच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. मात्र ते आमचे प्रदेशाध्यक्ष नाहीत. कारण त्यांची नेमणुक अधिकृत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होणार का?
हेही वाचा…नीलम गोऱ्हेंचं शिंदे गटात प्रवेश, ‘भावी आरोग्यमंत्री’ म्हणून सुषमा अंधारेंनी दिल्या शुभेच्छा