मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून विविध चर्चा केल्या जात आहेत. त्या चर्चांमुळे माझ्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. वीस वर्षापासून सुट्टी घेतली नाही, त्यामुळे आता मला विचार करण्यासाठी अंतर्मुख होण्यासाठी सुट्टी गरज आहे. त्यामुळे मी आता राजकारणातून ब्रेक घेत आहे. असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
पंकजा मुंडे ह्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांना दोन महिन्याची सुट्टी हवी आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद करू. त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ. अशी शक्यता आहे की, राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता. त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रूचेल पटेल आवडेल. सगळे स्वागत करतील असा असं आम्हीही समजत नाही. तेही समजत नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमधून संवादातून मार्ग निघत असतो. त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
दरम्यान, गेल्या काही दिवसात एका चॅनेलने मी काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी दिली. सांगलीच्या एका नेत्यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी दोन वेळा भेट झाली आणि मी काॅंग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवण्यात आलं. असं काहीही झालं नाही. त्यामुळे आता या चॅनेलच्या विरोधात अब्रुनुकसानिचा दावा ठोकणार, कोर्टात जाणार. अन् त्यांना यासंदर्भात पुरावे देण्यास सांगणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी काॅंग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना खंडन केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुषमा अंधारेंमुळे ठाकरे गट सोडताहेत का? निलम गोऱ्हेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या, “अजून काही वेटींग लिस्टवर..”,
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिपुत्रांच्या सत्ता संघर्षात प्रशासकीय ‘वाघाची शिकार’? राहुल कलाटे यांना शह देत जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली
हेही वाचा…निलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदे गटात केला पक्ष प्रवेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट