बीड : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर माझ्याविषयी अनेकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या. उमेदवारी मिळत नाही, म्हणून भाजप सोडून इतर पक्षाच्या वाटेवर जाणार अशा चर्चा करण्यात आल्या. यातच काल काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा झाल्या. त्यामुळे याविषयी अनेकदा भूमिका मांडली तरी अशा चर्चा होत आहेत. त्यामुळे आज माझी स्पष्ट भूमिका मांडत असल्याचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
गेल्या काही दिवसात एका चॅनेलने मी काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी दिली. सांगलीच्या एका नेत्यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी दोन वेळा भेट झाली आणि मी काॅंग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवण्यात आलं. असं काहीही झालं नाही. त्यामुळे आता या चॅनेलच्या विरोधात अब्रुनुकसानिचा दावा ठोकणार, कोर्टात जाणार. अन् त्यांना यासंदर्भात पुरावे देण्यास सांगणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी काॅंग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना खंडन केलं आहे.
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
माझ्या भाषणाची तुकडे काढून त्यांचे अर्थ लावले जातात. या काही ठिकाणी याचे अर्थसमर्पकही बसतात. माझ्या घरी त्यामुळे दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले. सकाळी नऊ वाजता मला फॉर्म भरायला येण्याचाही सांगितलं गेलं. पक्षाकडनं आणि त्याच्या दहा मिनिट आधी मला फोन येऊन सांगितलं .की तुम्ही फॉर्म भरायचा आ.हे असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेशामध्ये पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. या चॅनलला माहिती कोणी दिली ही माहिती का दिली या माहितीचा असे मूर्त का गाठले जातात की अशावेळी माझ्या नैतिक प्रश्न निर्माण राजकारण मी करेल किंवा नाही करेल कधी करेन कुणाशी करेन हा वेगळा विषय. पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली. मला जे बोलायचं ते मी ठणकावून सांगेल. मला जर काही करायचंय तर ते ढंके की चोट पण करेल. मी असा कुठे अंधारात जाऊन करणार नाही. माझ्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला ऐकणारे हजारो लाखो लोक येत असताना प्रश्न पडला. त्यातले कितीतरी लोक मला प्रश्न करता हेत. काही तुम्ही काय करताय. अनेक प्रश्न तर असे म्हणतात. की ताई तुम्ही हे करा. हे योग्य ते नाही. या सगळ्या लोकांच्या प्रश्नांमध्ये या सगळ्या लोकांच्या कन्फ्युजन मध्ये माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की राजकारणात येण्याचा माझा मुलगा म्हणून राजकारणात आले भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये दौडत होती.
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की राजकारणात येण्याचा माझा हेतू म्हणून राजकारणात आले. भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये दौडत होती. त्याचे विचार माझ्या रक्ता दौडत होते. त्याचं कारण पंडित दीनदयाचे उपाध्यय यांचे विचार. अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श. गोपीनाथ मुंडे यांनी घालून दिलेलेच संस्कार. पक्ष हा सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी आपल्या राष्ट्र सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्या संघटना आणि त्याच्यानंतर सत्ता आहे. सत्ता आहे आणि संघटन महत्वाचं नाही अशा विचारांची मी नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला जो व्यक्त होऊ शकत नाही. ते 106 आमदार जे भाजपावरून निवडून आले ते सर्व कार्यकर्ते जे 30 दिवस मोदी अॅड नाईट मध्ये दाबलेत. ह्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतील पण बोलण्याची ताकत नाही. त्यांच्यामध्ये ना आज पंकजा मुंडे म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे हे सांगते की अप्रमाणिकपणा माझ्या स्वभावात नाही माझ्या स्वभावामध्ये व्याळ बोलणं कोणाला टीका करणे कोणाविषयी वैयक्तिक बोलणं हे देखील नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना चांगलचं सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला