मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदार शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेतील ११ पैकी तीन आमदार आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामध्ये मनिषा कायंदे, विपलं बजोरिया हे ठाकरे गटातून शिंदेंच्या गटात गेले आहेत. यातच आता निलम गोऱ्हे शिंदेंच्या वाटेवर असल्याने अनेक चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
दरम्यान, सुषमा अंधारे यांना अधिक संधी मिळत असल्याने शिउबाठा नेत्या आणि विधानपरिषद सदस्य असलेल्या निलम गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता यावर निलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर