नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर बडतर्फेंची कारवाई केली जात आहे. तर यातच आता पुणे शहाराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या गटाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवारांचं शिंदे गटाने मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे गद्दारीचं..,”
राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मानकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला पुणे महिला शहाराध्यक्षपदी रूपाली पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!
दरम्यान, मानकर हे पुण्याच्या राजकारणात कट्टर अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दीपक मानकर यांनी अजितदादांसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. तर विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गटामध्ये कार्यरत राहणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
हेही वाचा…“नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत”, शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला इशारा
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात