विरेश आंधळकर, मुंबई : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता राज्यातील आणखीन एक मोठा पक्ष फुटताना पाहत आहे. आजवर काका शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे राहणारे अजित पवार यांनी रविवारी अचानक भाजप – शिवसेना युतीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुरुवातीला शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याला सहमती असल्याची भावना होती. मात्र आता काका – पुतण्यांमध्ये राजकारणासोबतच नात्यामध्ये देखील ठिणगी पडल्याचे अजित पवार यांच्या भाषणातून दिसून आले. आजवर आपल्यावर कसा अन्याय झाला? याचा पाढा अजितदादांनी वाचला. तर शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळेंनी थेट लढाईचा इशारा दिला.
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हे सर्व घडत असताना अजितदादांच्या बंडा मागे असणारे मास्टरमाईड, सध्या पक्ष ताब्यात घेण्यापासून ते राज्यभरातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यापर्यंत रणनीती आखत आहेत. यातील एक नेता महाराष्ट्रातील संघटनेसोबत समन्वय साधत असून दुसरा नेता दिल्ली दरबारी कायदेशीर लढाईसोबत भाजपच्या वरिष्ठांशी समन्वय ठेवण्याचे काम करत आहे. हेच दोन दिग्गज नेते शरद पवार यांच्या देखील रडारवर आले आहेत. या दोघांतील एक म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि दुसरे अजित पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. पटेल आणि तटकरे यांनीच अजित पवारांचे मन भाजपसोबत जाण्यासाठी तयार करण्यापासून ते कालचा शपथविधी आणि आज पक्षावर दावा करण्यापर्यंत महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात आहे.
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून प्रफुल्ल पटेल हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात पटेल यांची विशेष पकड नसली तरी दिल्ली दरबारी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय चेहरा म्हणून त्यांना ओळखल जात. राष्ट्रीय राजकारणात पवारांच्या वतीने वाटाघाटी करण्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांच्यावरच असे, राजकारणी असतानाच बिझनेसमध्ये देखील प्रफुल्ल पटेल यांचा मोठा बोलबाला आहे. अजित पवार यांच्या वतीने भाजपच्या नेतृत्वाशी वाटाघाटी करण्यात पटेल यांचीच मोठी भूमिका राहिल्याचे मानले जाते. प्रफुल्ल पटेल हे ईडी तसेच सरकारी यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. ईडीने यापूर्वीच त्यांची वरळीतील मालमत्ताही जप्त केली होती. आजच्या घडीला मुंबईतील सर्वात महागडी मालमता प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे.
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती
अजित पवारांच्या बंडातील दुसरे मास्टरमाईंड सुनील तटकरे हे असल्याची चर्चा आहे. तटकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणारे सुनील तटकरे १९८४ साली काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांची साथ दिली. आघाडी सरकारच्या काळामध्ये अर्थ, ऊर्जा तसेच वेगवेगळ्या खात्यांचा मंत्री म्हणून त्यांनी काम केल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देखील तटकरे यांनी सांभाळली होती. राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याने पक्ष संघटनेत काम केल्यामुळे सर्व आमदारांशी त्यांचे खास संबंध आहेत. भाजपकडून वारंवार आरोप करण्यात येणाऱ्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात सुनील तटकरे यांचा नाव आल्यानंतर ते ईडीच्या रडावर आले. यामुळेच भाजपसोबत जाण्यासाठी ते कायम आग्रही असल्याचं राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आलीय. खासदार सुर्पिया सुळे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी पटेल आणि तटकरे यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी केली. पत्रकार परिषद असो कि कालची बैठक पवार गटाकडून या दोघांना टार्गेट करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
हेही वाचा…“नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत”, शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला इशारा
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात
हेही वाचा…अजित पवारांचं शिंदे गटाने मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे गद्दारीचं..,”
हेही वाचा…राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!