नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवड केली आहे. यातच आज शरद पवार गटाकडून दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीवर आता अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आले आहे.
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ
दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीत शरद पवार यांच्यासह खासदार, वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील, फौजीया खान, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची बैठक होत आहे. परंतु या बैठकीत आता अजित पवार गटाने आक्षेप घेतला आहे. शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकारीणीच्या सदस्यांना आमंत्रण दिलं होतं. यात प्रफुल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, छगन भुजबळ यांच्याकडून कोणीही गेलेले नाहीत.
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
दरम्यान, मुळ राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात असल्याचं कुणीही बैठक घेऊ शकत नाही. हा वादाचा निपटारा होईपर्यंत कुणीही बैठक होऊ शकत नाही. असे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
शरद पवारांनी बोलवलेल्या राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीवर अजित पवार गटाचा आक्षेप. pic.twitter.com/bGjGqfNQto
— Harichandra Pawar (@HarichandraP77) July 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांचं शिंदे गटाने मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे गद्दारीचं..,”
हेही वाचा…राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती