पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे अनेक नेते अजित पवार गटात सहभागी झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावरून आता दिपील वळसे पाटील साहेब तुम्हाला पवार साहेबांनी स्वत:च्या मुलाप्रमाणे नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. मग अचानक असा निर्णय का घेतला. ? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाकडून पुणे शहाराध्यक्षासाठी ‘या’ नेत्याची निवड, रूपाली पाटलांवरही जबाबदारी मिळणार
रोहित पवार यांनी आता अजित पवार गटातील मंत्र्यांना राष्ट्रवादीकडून कोण कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. याबाबत ट्विट करत त्यांना काही सवाल केले आहेत. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. असा सवाल रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना केला आहे.
हेही वाचा…मंत्रिपदासाठी दंड थोपटून आमदार भिडले, शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावले
तसेच केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपुर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहिलंच, परंतु वळसेपाटील साहेब तुम्ही स्वत:ला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी
दरम्यान, रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना देखील सवाल केला आहे. प्रफुल्ल पटेल साहेब पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे… pic.twitter.com/Kg06T3C5Wp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल
हेही वाचा…“४० आमदारांचा पाठिंबा असला तरी अजित पवारांना राष्ट्रवादीवर दावा सांगता येणार नाही”
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार