मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारचा सुखी संसार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी आसुसलेले आमदार आता आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून दोन आमदारांत मंगळवारी सायंकाळी बाचाबाची आणि झटापट खात्रीलायक झाल्याचे वृत्त पुढे आलं आहे. आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले.
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठीक मंगळवारी पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या स्वागतासाठी नागपूरला गेले. मात्र इकडे मुंबईमध्ये मंत्रिपदावरून शिंदे गटात अंतर्गत धुसफूस वाढल्याने दोन आमदार थेट भिडले. दोघांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाल्याने वाद वाढल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
दरम्यान, शिवसेना भाजपच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्याने भाजपमधील आमदार आणि नेतेही प्रचंड नाराज असल्याचं बोलले जात आहे. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीकडून मंत्रीपदाची शपथ घातल्याने, भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे वेगळ्या निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समर्थकांकडून सांगितल जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी
हेही वाचा…“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले