मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आज दोन्ही गटांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ३३ आमदार उपस्थित होते.
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल
दुसरीकडे शरद पवार यांची मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे एकूण १३ विधानसभा, आमदार, ३ विधानपरिषद आमदार आणि ५ खासदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांच्याकडेच विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ अधिक असल्याचं दिसलं आहे.
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला
अजित पवार गट उपस्थित आमदार
अजित पवार -बारामती
छगन भुजबळ, येवला
धर्मरावबाबा आत्राम, अहेरी
माणिकराव कोकाटे, सिन्नर
मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव
अण्णा बनसोडे, पिंपरी
दिलीप वळसे पाटील, आंबेगाव
संग्राम जगताप, अहमदनगर शहर
दत्ता भरणे
संजय बनसोडे
अदिती तटकरे
नरहरी झिरवळ
दिलीप मोहिते
धनंजय मुंडे
अनिल पाटील
प्रकाश सोलंके,माजलगाव बीड
बाळासाहेब पाटिल लातूर
बाळासाहेब आजबे, आष्टी
सुनील शेळके, मावळ
अतुल बेनके, जुन्नर
निलेश लंके, पारनेर
दिलीप मोहिते
राजू कोरेमोरे
विधानपरिषद
रामराजे निम्बालकर
अमोल मिटकरी
विक्रम काळे
अनिकेत तटकरे
शरद पवार गट (उपस्थित आमदार)
अनिल देशमुख
रोहित पवार
राजेंद्र शिंगणे
अशोक पवार
किरण लहमाटे
देवेंद्र भुयार
प्राजक्त तनपुरे
बाळासाहेब पाटील
शरद पवारांना पाठिंबा देणारे विधान परिषदेचे आमदार
शशिकांत शिंदे,
बाबाजानी दुराणी
एकनाथ खडसे
खासदार
श्रीनिवास पाटील (लोकसभा),
सुप्रिया सुळे (लोकसभा),
अमोल कोल्हे (लोकसभा),
फौजिया खान (राज्यसभा)
वंदना चव्हाण (राज्यसभा)
READ ALSO :
“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी