मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर आज दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे ३१ आमदार उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या बैठकीला १२ आमदार उपस्थित होते. त्यानंतर या दोन्ही बाजूंच्या आमदारांना आता सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.
हेही वाचा…नॉटरिचेबल असलेले आमदार उगवले, अजित पवारांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार उपस्थित
अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांची बैठकीत शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी अन् शरद पवार यांचा संपुर्ण इतिहास सांगितला. तसेच कशा पद्तीने राष्ट्रवादीत अन्याय झाले ते देखील अजित पवारांनी सांगितलं. यातच अजित पवारांची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या संपुर्ण नेत्यांना आता ताज महाल हॉटेलमध्ये हालवण्यात आलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडे 28 आमदार तर शरद पवारांकडे किती आमदार ? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
दरम्यान, अजित पवारांच्या बैठकीनंतर अजित पवार गटातील आमदारांना खासगी बसने ताज हाटेल मध्ये हालवण्यात आलं. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारला होता. त्यावेळी त्यांना गुवाहाटीला नेण्यात आलं होतं. यातच आता कोणतीही गडबड होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांना आता एकत्रित ठेवलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला