मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच आज अजित पवार आणि शरद पवार गटाची स्वतंत्र बैठक होत आहे. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. यातच आता या बैठकांकडे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…विश्वासू नेत्यांनी दगा दिला, शरद पवार आक्रमक, पहिली सभा त्याच बंडखोराच्या मतदारसंघात
अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार दाखल झाले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीसाठी १० आमदार हजर झाले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बैठकीच्या ठिकाणी पोहचले आहे. झिरवळ गेल्या दोन दिवसापासून नॉटरिचेबल होते.
हेही वाचा…राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण ? कारण आले समोर
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललीत. यातच आता राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांत कोण बाजी मारणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांकडे 28 आमदार तर शरद पवारांकडे किती आमदार ? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
हेही वाचा…राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? अजित पवारांचा बंड यशस्वी होणार का ? आतापर्यंत किती आमदार बैठकीला पोहचले ?
हेही वाचा…“जर शरद पवारांनी भेटायला बोलवलं तर..,” छगन भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीत “पॉवर फुल्ल” कोण ? पुतण्या काकांवर भारी पडणार का ? दोन्ही गटांच्या बैठकीत आमदारांची रेलचेल
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर वारं फिरलं..! शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतणार, बड्या नेत्यांचं मोठं विधान