मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात याचिका करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणक आयोगात आता दोन्ही गटाची लढाई होणार आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर दावा अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आला आहे. यातच ३० जून रोजीच अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमणुक केल्याचा अजित पवार गटाकडून सांगितलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडे 28 आमदार तर शरद पवारांकडे किती आमदार ? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
अजित पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सर्वमताने निवड झाल्याचे पत्र देखील निवडणुक आयोगाकडे देण्यात आलं आहे. आयोगातल्या सुत्रांची माहिती या पत्राची तारीख किती असणार याची उत्सुकता असेल. ३० जुन रोजी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखल करण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्या गटातील ९ आमदारांवर अपात्रतेसंदर्भात कारवाईसाठी पत्र दिल्याचे निवडणुक आयोगाला जयंत पाटलांना कळवलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? अजित पवारांचा बंड यशस्वी होणार का ? आतापर्यंत किती आमदार बैठकीला पोहचले ?
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका ह्या शिंदे-भाजपसोबत लढणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेच्या ९० जागा आपण लढणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर आता भाजप आणि शिंदे गट किती लढवणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…नॉटरिचेबल असलेले आमदार उगवले, अजित पवारांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार उपस्थित