मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच आज अजित पवार आणि शरद पवार गटाची स्वतंत्र बैठक होत आहे. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. यातच आता या बैठकांकडे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा…राष्ट्रवादीत “पॉवर फुल्ल” कोण ? पुतण्या काकांवर भारी पडणार का ? दोन्ही गटांच्या बैठकीत आमदारांची रेलचेल
गेल्या अनेक दिवसापासून आम्ही राज्यातील काही नेत्यांच्या नेमणुका करायला सांगत होतो. अजित पवार यांनी देखील याबाबत भाष्य़ केलं होतं. मुंबईला अजूनही अध्यक्ष पद नाही. महिला अध्यक्षा नाही. आम्ही सांगून सांगून तरी नेमणुका झाल्या नाहीत. आज आमच्याकडे ४० पेक्षा आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच आम्हाला देखील कायदा समजतो. त्यामुळे कुणी काहीही सांगो , आमचं काम आम्ही करीत राहू असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच २०१९ ला काय झालं ते सर्वांना झालं. परंतु गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का ? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांना केला.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर वारं फिरलं..! शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतणार, बड्या नेत्यांचं मोठं विधान
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललीत. यातच आता राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांत कोण बाजी मारणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…नॉटरिचेबल असलेले आमदार उगवले, अजित पवारांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार उपस्थित
हेही वाचा…अजित पवारांकडे 28 आमदार तर शरद पवारांकडे किती आमदार ? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
हेही वाचा…राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? अजित पवारांचा बंड यशस्वी होणार का ? आतापर्यंत किती आमदार बैठकीला पोहचले ?
हेही वाचा…“जर शरद पवारांनी भेटायला बोलवलं तर..,” छगन भुजबळांचं मोठं विधान