मुंबई : 2014 मध्ये लोकसभेसाठी राष्ट्रवादीला सोबतीची ऑफर होती. शिवसेना १६, भाजप १६ अन् राष्ट्रवादी १६ जागा लढू, असं ठरलं होतं. आपल्याच ४७ जागा जिंकून येतील असा दावा होता. नितीन गडकरींची ती इच्छा होती, पण नतंर ती ऑफर भाजपनं नाकारली, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची बैठक पार पडली. त्यात ते बोलत होते.
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला
२००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१, काॅंग्रेसच्या ६९ जागा आल्या. सोनिया गांधी यांनी विलासरावांना सांगितलं मुख्यमंत्रीपद त्यांना द्यावं लागेल, पण ४ मंत्रीपद जास्त घेऊन ते सोडून दिलं. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. असंही अजित पवार यांनी म्हटलं. यातच २०१९ च्या निकालानंतर एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक झाली. पाच बैठका झाल्या. कुठेही बोलायचं नाही, असं मला सांगितलं. जे ठरलं त्यात अचानक बदल झाला. शिवसेनेसोबत जायचं आहे. असं सांगितलं. असं अजित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा…नॉटरिचेबल असलेले आमदार उगवले, अजित पवारांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार उपस्थित
अजित पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सर्वमताने निवड झाल्याचे पत्र देखील निवडणुक आयोगाकडे देण्यात आलं आहे. आयोगातल्या सुत्रांची माहिती या पत्राची तारीख किती असणार याची उत्सुकता असेल. ३० जुन रोजी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखल करण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्या गटातील ९ आमदारांवर अपात्रतेसंदर्भात कारवाईसाठी पत्र दिल्याचे निवडणुक आयोगाला जयंत पाटलांना कळवलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल