मुंबई : आज माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, मात्र माझं मन रडत आहे. अशाच प्रकारे अजित पवारांनाही वेदना सहन कराव्या लागल्या असतील, पण ते कधी काही बोलले नाही. त्यांनी सगळंच सहन केलं आहे. ते सर्वात जास्त वेदनांना सामोरे गेले आहेत. दरम्यान यावेळी अजित दादा आता मन मोकळं करायचं आहे. अशा भावना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मांडल्या.
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला आहे. तसेच अजित पवारांनी सर्वात जास्त ठेचा खाल्ल्या असून त्यांना सगळ्यात जास्त वेळा मान खाली घालावी लागली आहे. अजित पवारांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. मात्र तरीही त्यांनी हे अपमान सहन केले आहेत. हे अपमान सहन करत असताना त्यांनी त्यांच्या सावलीलाही कळू दिले नाही. नेहमी त्यांच्यावर टीका झाली, मात्र शरद पवारांसाठी त्यांनी सगळं सहन केलं आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
दरम्यान, याआधी माझ्यावरही अशाच प्रकारचा अन्याय झाला होता. तेव्हा माझी नियत साफ होती. तेव्हा अजित पवारांनी माझी साथ दिली. त्यावेळी अजितदादा माझ्या पाठीशी होते. अजितदादांना याआधी ही मोठ्या संधी आल्या, मात्र त्यांना साहेबांसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी त्या सोडल्या. शरद पवारांच्या आदर्शमुळे हा पक्ष आज इथे पोहचला आहे. आज इथे सर्वच राष्ट्रवादी पक्षाचा स्वाभिमान म्हणून आले आहेत. हा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे मुंडे यांनी सांगितले. मात्र दादा मी आज एक सांगतो, तुमची नियत साफ आहे.त्यामुळे नियतीही तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी
हेही वाचा…“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड