मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आज दोन्ही गटांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ३३ आमदार उपस्थित होते.
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
राष्ट्रवादी कोणाची? यावरुन अजित पवार आणि शरद पवार गटांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही गटांनी आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला ३२, तर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १८ आमदार उपस्थित होते. 1 अजित पवारांनी २ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी अजित पवारांनी ३० जूनला ४० आमदारांच्या सह्यांचं एक पत्र घेतलं. हेच पत्र आज अजित पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल
दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सर्वमताने निवड झाल्याचे पत्र देखील निवडणुक आयोगाकडे देण्यात आलं आहे. आयोगातल्या सुत्रांची माहिती या पत्राची तारीख किती असणार याची उत्सुकता असेल. ३० जुन रोजी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखल करण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्या गटातील ९ आमदारांवर अपात्रतेसंदर्भात कारवाईसाठी पत्र दिल्याचे निवडणुक आयोगाला जयंत पाटलांना कळवलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी
हेही वाचा…“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली