नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवड केली आहे. यातच आज शरद पवार गटाकडून दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. काल झालेल्या सभेत देखील अजित पवार यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला. यातच ३० जुन रोजीच अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड केली आहे. यासंदर्भातच ३० जुन रोजी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार यांच्या गटाकडून देण्यात आलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचं ‘चिन्ह अन् पक्षनाव’ गोठवलं जाणार? निवडणुक आयोगात मोठ्या हालचाली
एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेतच आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हांची लढाई निवडणुक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. यातच आज दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची तीन वाजता बैठक शरद पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी होणार आहे. वर्किंग बैठक पक्ष संघटनेतील बदल, घटनादुरूस्ती याबाबत हालचाली होणार का ? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवण्याच्या अजित पवार गटाच्या कृतीला काय उत्तर देणार? त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी
हेही वाचा…“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….