नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर बडतर्फेंची कारवाई केली जात आहे. तर यातच आता पुणे शहाराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या गटाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“भाजपची ‘ती’ राष्ट्रवादीला ऑफर होती, पण..,” अजित पवार पहिल्यांदाच शरद पवाराचं ते सिक्रेट बोलले
राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिपक मानकर यांची निवड करण्याची शक्यता आहे. त्यांची आज अजित पवार गटाकडून अधिकृत घोषणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे महिला शहाराध्यक्षपदी रूपाली पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…शिंदेंसाठी गुवाहाटी होती, बैठक संपली अन् अजित पवारांनी आमदारांना बसमध्ये बसवलं, आणि पुढे….
दरम्यान, आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर आता पुढील रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर अनेक नेत्यांच्या नियुक्त्या देखील या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मंत्रिपदासाठी दंड थोपटून आमदार भिडले, शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावले
हेही वाचा…अजित पवार गटावर शरद पवार घाव घालणार? शरद पवार गटाच्या वर्किंग कमिटीची बैठक, मोठ्या घडामोडी
हेही वाचा…“आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवारांचा झाला,” धनंजय मुंडेंनी सगळंच सांगितलं
हेही वाचा…शिंदेंची ‘ती’ चुक अजित पवारांनी केली नाही, वेळीच डाव साधला, शरद पवारांना दिलं धोबीपछाड
हेही वाचा…राष्ट्रवादीत कोण पॉवरफुल ? वाचा दोन्ही गटांच्या आमदारांची संपुर्ण यादी