कोल्हापूर : अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय समीकरण बदलली आहे. यातच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरात भाजपचे ग्रामीण शहाराध्यक्ष समरजीत घाटगे नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. हसन मुश्रीफांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर समरजीत घाटगे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता समरजीत घाटगे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?
कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटके यांच्याकडे पाहिले जाते. यातच हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर घाटगे नाराज झाल्याने काल फडणवीसांनी देखील भेट घेतली होती. आज समजजीत घाटगे कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करत असून आपली पुढची भूमिका मांडणार आहेत.
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष
जे काही झाले त्याबद्दल मला काही माहिती नाही. परंतु येणाऱ्या निवडणुक लढविणार म्हणजे लढविणार आणि एकदम करेक्ट कार्यक्रम करायचं. ज्या मार्जिने जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यापेक्षा जास्त मार्जिनने जिंकणार. असं समरजीत घाटगे यांनी म्हटलं आहे. अन् मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या नाराजीवर त्यांनी पुर्णविराम दिला.
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगे यांचा पराभव केला. त्यानंतर प्रत्येक सभेतून समरजीत घाटगे यांनी मुश्रीफांविरोधात रान पेटवलं. यातच पराभवाचा वचपा काढण्यासाठी समरजीत घाटगे यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. २०२४ च्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती मुश्रीफांचा पराभवर करणार असा प्रण देखील घेतला. पंरतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे घाटगे काय भूमिका घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल
हेही वाचा…“४० आमदारांचा पाठिंबा असला तरी अजित पवारांना राष्ट्रवादीवर दावा सांगता येणार नाही”