नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर बडतर्फेंची कारवाई केली जात आहे. तर यातच आता पुणे शहाराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या गटाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिपक मानकर यांची निवड करण्याची शक्यता आहे. त्यांची आज अजित पवार गटाकडून अधिकृत घोषणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे महिला शहाराध्यक्षपदी रूपाली पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
दरम्यान, अजित पवारांकडून निलंबित केलेले नरेंद्र राणे यांची अजित पवार गटाकडून संधी देण्यात आली आहे. नरेंद्र राणे यांची अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुण्यापाठोपाठ आता मुंबईत देखील शहाराध्यक्षांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून राज्यभरात नेमणुकांचं सत्र सुरू झालं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल
हेही वाचा…“४० आमदारांचा पाठिंबा असला तरी अजित पवारांना राष्ट्रवादीवर दावा सांगता येणार नाही”
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?