मुंबई : भाजप- शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एन्ट्रीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांची मंत्रीपदाची संधी हुकणार आहे. त्यामुळे आमदारांनी आक्रमक भूमिका घेतलीय. यामध्ये आता ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत आलेले काही आमदार पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु झालीय. भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटमुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे.
हेही वाचा…अजित पवारांची सरकारमध्ये एंन्ट्री..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार
“शिवसेनेचे बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येऊ शकतात”, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. “मी मुंबईत असून येथे शिवसेनेचे बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतात, असं ऐकले आहे. कारण मोदींनी आता राष्ट्रवादीला फूस लावली असून शिवसेनेच्या आमदारांची गरज संपल्याने त्यांना बाजूला करण्यात आल्याची भावना आहे.” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटल.
हेही वाचा…अजित पवार गटाकडून पुणे शहाराध्यक्षासाठी ‘या’ नेत्याची निवड, रूपाली पाटलांवरही जबाबदारी मिळणार
दरम्यान, शिंदेंसोबत गेलेले आमदार मंत्रीपदावर डोळा ठेवून होते, त्यासाठी कपडेही शिवले, मात्र आता आपल्याला मंत्रीपद मिळणार नसल्याच त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून काल शिंदे गटाच्या बैठकीत हे आमदार एकमेकांवर धावून गेले. अनेकांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचंही ऐकलं असल्याचं धक्कादायक खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.
I am Mumbai and I hear the Shiv Sena rebels may return to Uddhav Thakre , because of disgust at Modi wooing NCP and sidelining them after using them earlier
— Subramanian Swamy (@Swamy39) July 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल
हेही वाचा…“४० आमदारांचा पाठिंबा असला तरी अजित पवारांना राष्ट्रवादीवर दावा सांगता येणार नाही”
हेही वाचा…मोठी बातमी…! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव ?
हेही वाचा…अजित पवारांमुळे भाजपच्या नेत्याचा पहिला राजीनामा पडणार, मुश्रीफांमुळे समरजीत घाटगे नाराज, भूमिकेकडे लक्ष