मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात येणार असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावर आता शिंदे गटातील प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विनायक राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती
एकाचा उत कमी होता की काय म्हणून आता दुसऱ्याचा ऊत सुरू झाला आहे. उबाठाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची रिघ लागलेली आहे. पण, आमचे आमदार पुन्हा उबाठाकडे येणार असल्याच्या पुड्या विनायक राऊत सोडू लागलेत. अहो, आमदार सोडा साधा कार्यकर्ता तरी संपर्कात आहे का तुमच्या? असा सवाल शितल म्हात्रे यांनी राऊतांना केला आहे.
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ
आमच्या आमदारांवर डोळा ठेवण्याची गल्लत करू नका. नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत. जास्त उत मात करू नका. काळजी घ्या. असा खोचक टोला देखील शीतल म्हात्रे यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. आता शिंदे गटात असलेलेा उद्रेक आणि तो थांबवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होत असलेले त्रेटा तिरपट पहिल्यानंतर खुप दयनीय अवस्था त्यांची झाली आहे, त्यांच्यापैकी अनेक जणांनी आता पुन्हा मातोश्रीने साथ घातले तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक देऊन अशा पद्धतीनेे वक्तव्य सुद्धा केली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.
एकाचा ‘ऊत’ कमी होता की काय म्हणून आता दुसऱ्याचा ‘ऊत’ सुरू झालाय. उबाठाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची रिघ लागलेली आहे. पण , आमचे आमदार पुन्हा उबाठाकडे येणार असल्याच्या पुड्या विनायक राऊत सोडू लागलेत. अहो , आमदार सोडा साधा कार्यकर्ता तरी संपर्कात आहे का तुमच्या ?… https://t.co/z1N3dXKLkZ
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) July 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात
हेही वाचा…अजित पवारांचं शिंदे गटाने मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे गद्दारीचं..,”
हेही वाचा…राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली