मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितल्यानंतर आता शरद पवार गटाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. आज दिल्लीत झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना निलंबणीत करण्याचा निर्णय शरद पवार यांनी केला. तसेच बैठकीत शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहतील असा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. यातच दिल्लीतून शरद पवारांनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात
पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदरच मी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबद्दल काही तथ्य नाही, तसेच नवे अध्यक्ष नेमल्याची माहिती देखील मला नाही. काही जणांची पक्षाविरोधात कृती होती. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकणार असणार असून आगामी काळात पक्षाला उंचीवर घेऊन जाणार असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…अजित पवारांचं शिंदे गटाने मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे गद्दारीचं..,”
दरम्यान, तसेच वय हा काही मुद्दा नाही. वय ८२ आहे. पण वयाच्या ९२ वर्षांपर्यत लढू शकतो. असा पलाटवार अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी केला. निवडणुक आयोगावर आमचा विश्वास आहे. वेळ आल्यावर कुणाकडे किती संख्याबळ हे कळेल. तसेच वेळ आल्यास आम्ही सुप्रिम कोर्टात देखील जाऊ. असे संकेत शरद पवारांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
हेही वाचा…“नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत”, शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला इशारा