पुणे : दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशपातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला अजित पवार गटाने बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पक्षातील सध्याच्या बंडाळीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले आहे.
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणा पीसी चाको यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज 8 ठराव पारित केले.
हेही वाचा…“नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत”, शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला इशारा
समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात
दरम्यान, ही लढाई एवढी घानेरडी आणि विकृत आहे. महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात असलेला द्वेश आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना आपल्या सोबत नको होती. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता ते महाराष्ट्रही फोडतील. तेव्हा विरोध करायला त्यांना कुणी नको आहे मात्र ते आम्ही होऊ देणार नाही. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ज्यांनी घडविले तेच पळवून न्यायचे सुरु आहे. असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव