मुंबई : २०१९ मध्ये महाविकास आघाडी राज्यात बनली होती. मतदानाची आकडेवारी पाहिली तर हे आकडे जोडले तर महाविकास आघाडी ही भाजप-शिवसेनेपेक्षा आठ ते दहा टक्के अधिक आहे. ४८ पैकी ४२ जागा मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी मजबुत असतील तर भाजप एकेरी आकड्यात आली असती ८ ते १० भाजप जिंकल्या असत्या. त्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत करणे भाजपचे काम होते. असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नाही तर तुमचे शिल्लक आमदारही तुमच्या सोबत दिसणार नाहीत”, शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला इशारा
शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे. भाजपा, शिवसेना आमदारांमध्ये खूप नाराजी आहे. ९ राष्ट्रवादीचे आमदार बनलेत. त्यामुळे त्या जागा कमी झाल्या. बाकी जागा तिघांमध्ये वाटाव्या लागतील. राज्यातील अनिश्चिता बनली आहे. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाऊस झाला नाही, पेरणी झाली नाही. त्यात सरकारमध्ये नाराजी खूप आहे. सरकारकडे बहुमत पण आनंदी कोणच नाही. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…शरद पवारांसह वर्किंग कमिटीची बैठक..! अजित पवारांकडून आक्षेप, प्रकरण निवडणुक आयोगात
दरम्यान, आरोप-प्रत्यारोप होत असतात. प्रफुल पटेल यांनी धमकी दिलीय, त्यांनी आत्मचरित्र लिहिलं की अनेक गोष्टी बाहेर पडतील. ज्या नेत्यांना शरद पवारांनी पुढे आणले ते आता आरोप करतायेत. महाविकास आघाडीवर या फुटीचा परिणाम झालाय. अजित पवारांसोबत जे आमदार गेले ते आमच्यासोबत होते आता ते विरोधात गेले. ४-५ मतदारसंघात त्याचा फटका बसेल. ज्याप्रकारे शिवसेनेत विभाजनानंतर नेते एकनाथ शिंदें सोबत गेले, परंतु कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत होते. तसेच शरद पवारांच्या बाबतीत झाले. नेते गेले पण कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई