पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राज्यातील राजकीय गणित बदलली आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांसोबत लढण्याची नामुष्की ओढवली होती. त्याच उमेदवारांसोबत आता निवडणुक लढवणार असल्याने मोठी नाराजी देखील बघायला मिळत आहेत. यात शिरूर मतदारसंघाचं आता चित्र बदलणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका तर ग्रामीण भागातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हा मतदारसंघ कुणासाठी अनुकूल असेल? हा प्रश्न आता निर्माण झालाय.
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव
शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके आमदार असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. आंबेगाव मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहितेंनीही अजित पवारांची साथ दिलीय. हडपसरचे आमदार चेतन तुपेही अजित पवारांसोबत आहेत. तर शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ दिलीय. तर भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत.
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याचा दावा माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलाय. तर भाजपच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालं होतं. 5/7 मात्र आता अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यानं शरद पवारांसोबत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्लात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला होता. आता भाजपनंही शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का? अशी चर्चा सुरू झालीय.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड