रत्नागिरी :- देशाच्या पंतप्रधानांनी ज्या पक्षावर 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. विरोधी पक्षावर वीस लाख कोटींचा भ्रष्टाचार आरोप केला आणि 24 तासाच्या आत मध्ये त्याच पक्षाच्या लोकांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतात. हे देशातल्या राज्यातल्या जनतेला रुसणार नाही. पटणार नाही. पक्षातील निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा हे कदापि खपणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा खोलात जाईल महाविकास आघाडी जोमात येईल असं भाकित शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला आहे.
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
सरकारमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादीला मंत्रीपद त्यांना पटकन देण्यात आलेले आहेत. शिंदे गटाचा भवितव्य काय वाटतं? माझं काही चुकत असेल तर मी स्वतःला सुधारायला दुरुस्त करायला तयार आहे. पण माझी माहिती अशी आहे की, मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील करून घेताना त्यांना मंत्रीपद किती द्यायची? किती महामंडळ द्यायची? याच्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना सामावून घेतलं होतं की नव्हतं याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. असं देखील जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जात असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं का? असा सवालही केला आहे. तर ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे. कारण वैधानिक कामकाजाच्या पद्धतीनुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लावून भेटलं पाहिजे. त्यांनी ऍडव्हान्स मध्ये त्यांना पत्र दिले पाहिजे आणि आम्हाला या या लोकांना मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ म्हणून शपथ घ्यायची आहे. मंत्रिमंडळामध्ये तेव्हा आपण वेळ द्या आणि त्यांची मान्यता घ्यावी लागते. परंतु अशी कुठलीही प्रक्रिया झालेली माझ्या निदर्शनात आलेली नाही. पहिल्यांदा अजित पवार आणि हे सगळे राजभवनवर गेले. नंतर देवेंद्र फडणवीस वगैरे हे गेले. नंतर राज्याचे मुख्यमंत्री फार उशिराने गेले आणि तासात दोन तासात शपथविधी पार पडला. त्यामुळे ही राज्यपाल महोदय यांच्याकडे चर्चा हीच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा आमदारात ठेवून झाली असावी, असंही मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात