मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनाव आणि चिन्ह याची लढाई कोर्टात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यातच आता बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आणि संघटना वाढविण्यासाठी शरद पवार मैदानात उतरून सभा घेणार आहेत. यातच शरद पवार यांची पहिली सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात होणार आहे.
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या सभा होतील. त्याला प्रत्युत्तर म्हणून मला देखील सभा घ्याव्या लागतील असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे शरद पवार आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
दरम्यान, 83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार आहे. उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक सभा होणार आहे. धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल, अस ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.
83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार…
राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार..
उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक सभा..
धुळे आणि…— NCP (@NCPspeaks) July 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं