मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. यातच आता राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे पडले आहेत. तसेच आता दोन्ही गटात किती आमदार, खासदार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता अजित पवार गटाकडे गेलेले आमदार शरद पवार गटात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
अजित पवारांच्या बंडानंतर मुंबईत दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यावेळी अजित पवार यांच्या गटात ३६ आमदार तर शरद पवार गटात १८ आमदार उपस्थित होते. यामध्ये विधान परिषदेचे आमदार, आणि खासदार देखील उपस्थित होते. तर काही आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यातच आता संख्याबळ वाढविण्यासाठी जास्त आहेत. यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दरम्यान, शरद पवार गटाकडे मुंबईत झालेल्या बैठकीत १९ आमदार होते. त्यांचे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतले आहेत. तर अजून सहा आमदारांनी शरद पवार यांना सोबत येण्याचे आश्वासन दिले आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांच्याकडील आमदारांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा २५ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहेत.
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
शरद पवार यांना समर्थन करणारे आमदार राजेश टोपे, सुनील भुसार , चेतन तुपे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तिन्ही आमदार वेगवेगळे जाऊन भेटून आले. भेटून आपली भूमिका स्पष्ट केली .शरद पवार यांच्या बरोबर राहणार असून अजित पवार बरोबर येऊ शकत नाही. हे सांगून आल्याची निकटवर्तीयांनी माहिती दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर