मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड पुकारल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत पडले असून आता राजकीय लढाई सुरू झाली आहे. यातच आता दोन्ही गटात नव्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. यातच काल शरद पवार गटाची दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
काल शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यातच आज अजित पवार गटाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर दावा सांगितला असून अजित पवारांना ३० जुन रोजीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणुक केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिपुत्रांच्या सत्ता संघर्षात प्रशासकीय ‘वाघाची शिकार’? राहुल कलाटे यांना शह देत जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली
दरम्यान, अजित पवार गटाने विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या प्रतोद पदी निवड केली आहे. याअगोदर अनिल पाटील यांची विधानसभा प्रतोद पदी तर अजित पवार यांची विधानसभा गटनेता म्हणून नेमणुक केली आहे.
राष्ट्रवादीच्या पक्षीय बांधणीत नियमांची पायमल्ली झाली आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रवादीत निवडणुका झाल्या नाही. परंतु सध्या राष्ट्रवादीच्या सर्व नियमानुसार कामकाज सुरू आहे. कालची पवारांची बैठक अधिकृत नव्हती. असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. पक्ष म्हणून आम्ही निवडणुक आयोगाकडे जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होणार का?
हेही वाचा…नीलम गोऱ्हेंचं शिंदे गटात प्रवेश, ‘भावी आरोग्यमंत्री’ म्हणून सुषमा अंधारेंनी दिल्या शुभेच्छा
हेही वाचा…“..त्या दिवशी त्या गायब होत्या, संधीसाधू लोकं,” ठाकरे गटाने निलम गोऱ्हेंवर केली परखड टिका
हेही वाचा…राजकारणातून ब्रेक घेणार..! पंकजा मुंडेंच्या विधानावर फडणवीसांचं सुचक विधान, म्हणाले, “राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने..”, *