मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिचुकले यांना इडीने अटक केली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आरोप केला होता. काल रात्री सुजित पाटकर यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी
कोरोळा काळात लाईपलाईन कंपनीनं वैद्यकीय साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने दाखल केला आहे. या कंपनीत संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. तसेच लाईपलाईन कंपनीत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोर भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”
दरम्यान, गेल्या महिन्यात इडीने शिवसेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्यासह १५ जणांच्या घरावर छापे मारले होते. यात महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचाही समावेश होता. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही धाड टाकली होती.
READ ALSO :
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री