पुणे : राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे.
संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांचा जोरदार प्रहार, अनिल परबांनाही दिला इशारा
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे. यात चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून आजच मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे काही कार्यकर्ते कसबा गणेश मंदिरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचं भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पंढरपुरात देखील भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली आज गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महतांच्या उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव होईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. नागपूर आणि औरंगाबादमध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ठिकठिकाणी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शनं केली जात आहेत.
Read Also :
- टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक
- मोठी बातमी : शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा धक्का
- अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळालेली नाही, चौकशी सुरुच आहे; सीबीआय’चा मोठा खुलासा
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार