कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप एकनाथ गायकर यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार केल्यानंतर गायकर यांच्या विरोधात विनयभंगाचा बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेड-भाजप युतीचे संकेत!
माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी एखाद्याने चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्याप्रमाणे योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असं सष्ट मत व्यक्त केलं आहे.
केंद्र सरकारने आमचे ३० ते ३२ कोटी रुपये अगोदर द्यावे – अजित पवार
कल्याण मधील एका महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, केडीएमसी माजी स्थायी सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी सन 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या काळात वेळोवेळी चार चाकी वाहनाने पाठलाग करून समाजात व नातेवाईकात बदनामी करेल , चेहऱ्यावर ऍसिड टाकून चेहरा खराब करेल , तुला सोडणार नाही, फिर्यादी महिला आणि मित्र परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत जबरदस्तीने हात पकडून विनयभंग करत न थांबता इंस्टाग्रामवर आणि वॉट्स ॲपवर अश्लील मेसेज टाकून बदनामी केल्याप्रकरणी केडीएमसी माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदिप गायकर यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी बाजरपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Read Also :
- ‘राजकारणात कुणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचे, हे क्रिकेटमुळे चांगले माहिती!’
- मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, संभाजीराजे कडाडले…
- चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
- “माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
- स्वप्न पुर्ण झालं: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश