वाशिम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. ही बातमी संपता ना संपता राज्यातील आणखी एक आमदाराच्या निधनाची बातमी समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेंद्र पटणी यांचं दिर्घ आजाराने आज निधन झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज
गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पटणी आजाराशी झुंद देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र पटणी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
तसेच पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला… pic.twitter.com/LsvH0n4upq— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचा..महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
हेही वाचा“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन