मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षनाव दिलं. त्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणुक चिन्हांसाठी देखील अर्ज करण्यात आला होता. यामध्ये शरद पवार गटाने कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी अशी तीन नावं निवडणुक आयोगाने सादर केली होती. त्यावर काल निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला पुढील सर्व निवडणुकांसाठी तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असं शरद पवार गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी..! असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुक आयोगाचे आभार मानले आहेत. आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा..महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
हेही वाचा“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज