नवी दिल्ली : देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजपने इंडिया आघाडीचा धसका घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची एकजुट बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूनेही भाजपने याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी छत्तीसगडमधील बिलासपूर शहाराला भेट देणार आहेत. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहत परिवर्तन महासंकल्प रॅली लाही संबोधित करणार आहेत. यातच तीन महिन्यांतील मोदींचा तिसरा छत्तीसगडचा दौरा असून आगामी निवडणुकीत रमन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा छत्तीसगड विधानसभेच्या २०१८ च्या निवडणुकीत काॅंग्रेसकडून पराभव झाला होता. याठिकाणी काॅंग्रेसच्या ९०पैकी ७१ जागा असून भाजपकडे केवळ १५ जागा आहेत.
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
दरम्यान, छत्तीसगडच्या दौऱ्यानंतर मोदी तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्याचा १ ऑक्टोबरला दौरा करणार असून ३ ऑक्टोबरला निजामाबादला पोहचतील. याठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यातच २ ऑक्टोबर गांधी जयंतीला मोदी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला भेट देऊन त्याठिकाणी दोन जाहीर सभा घेणार आहेत. ५ ऑक्टोबरला मोदी पुन्हा मध्य प्रदेश दौऱ्यावर जबलपूर आणि जगदलपूरमध्ये ते जाहीर सभा घेऊ शकतात.
READ ALSO :
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”