पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची २ ऑक्टोबर रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत २० लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांनी २० लोकसभा मतदारसंघांसाठी २० निरीक्षक नेमले होते. हे निरीक्षक आता २ तारखेला आपला अहवाल सादर करणार आहेत. सदर बैठकीच राज ठाकरे अहवाल पाहून पुढचा निर्णय घेणार आहेत.
हेही वाचा…फडणवीसांची खेळी यशस्वी, तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी समाजाचे उपोषण मागे
मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाचा निरिक्षक म्हणून जबाबदारी होती. ते देखील या बैठकीत आपला अहवाल सादर करणार आहेत. नुकतीच अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेचे कोणते नेते इच्छूक आहेत, याबाबत देखील अमित ठाकरे यांनी चाचपणी केली होती.
हेही वाचा…ठाकरे गटाचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच दणका, त्यामुळे रद्द करावा लागला परदेश दौरा
हा सर्व अहवाल अमित ठाकरे २ तारखेच्या बैठकीत राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहेत. २० लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांकडून येणाऱ्या अहवालानंतर राज ठाकरे पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अहवाल पाहिल्यानंतर मनसे लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे, या संदर्भात चर्चा होऊन राज ठाकरे निर्णय घेणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मध्यप्रदेश भाजपच्या हातून निसटणार, राजस्थानमध्ये अटीतटीची लढत, निवडणुकांचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर
हेही वाचा…शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार, शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा
हेही वाचा…“आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा पहिला राजीनामा देणार”, ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…मोठी बातमी…! एक देश, एक निवडणुक २०२४ ला नाही तर ‘या’ वर्षापासून लागू होणार, ? विधी आयोगाचा मोठा खुलासा
हेही वाचा…राज्यातील भाजपचे ‘हे’ दिग्गज आमदार लोकसभा लढणार, भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत