मुंबई : गेल्या दीड वर्षापासून शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. परंतु या प्रकरणावर अद्यापही निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात असतांना विधानसभा अध्यक्ष सध्या संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जाणार होते, परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. यातच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दौरा रद्द केल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! एक देश, एक निवडणुक २०२४ ला नाही तर ‘या’ वर्षापासून लागू होणार, ? विधी आयोगाचा मोठा खुलासा
राहुल नार्वेकर घाना देशात संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी जाणार होते. याआधीच आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. यातच राहुल नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली. यानंतर राहुल नार्वेकरांनी परदेश दौरा रद्द केल्याचं म्हटलं जातंय. यातच राज्याच्या पैशावर सहली करण्याचा डाव सरकारचा होता. या दोन सहली आदित्य ठाकरे यांच्यामुळे रद्द झाल्या. असा टोला अरविंद सावंत यांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा…राज्यातील भाजपचे ‘हे’ दिग्गज आमदार लोकसभा लढणार, भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत
जातीपातीमध्ये भेद निर्माण करून सत्तेत यायचं असं घाणेरडं राजकारण सुरू आहे. मतदारसंघाचा आढावा बैठका मध्ये घेतला जात आहे. लोकांच्या समस्या काय आहेत. त्या समोर आल्या पाहिजे. भाजप महाराष्टातल्या आमदारांना लोकसभेसाठी उभं करू शकतात, ही वेळ केव्हा झाली आहे. मध्य प्रदेशातल्या निवडणुकांसाठी ही तयारी केली जाते. त्यामध्ये तुम्ही बघताय ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंबईतले आमचे नगरसेवक कुठेही जाऊद्यात उद्धव ठाकरे यांनी सांगितले ज्यांना जायचं त्यांनी जा जनता आमच्या सोबत आहे निष्ठावंत शिवसैनिक आमच्या सोबत आहे. असंही सावंतानी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…मध्यप्रदेश भाजपच्या हातून निसटणार, राजस्थानमध्ये अटीतटीची लढत, निवडणुकांचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर
हेही वाचा…शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार, शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा
हेही वाचा…“आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा पहिला राजीनामा देणार”, ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा