मुंबई : ठाण्यातील कट्टर शिवसैनिक तसेच ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखले जाणारे आंनद दिघे यांची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारीत “धर्मवीर” नावाचा चित्रपट आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनाकडून मोठं जल्लोष साजरा केला जात असताना भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही. परंतु निवडणुक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारीत धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे . परंतु त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नसल्याची खंत निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
“औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
धर्मवीर या चित्रपटात आंनद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे चित्रपट निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. धर्मवीर मु. पो. ठाणे असं त्या चित्रपटाचं नाव असून तो आज प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
दरम्यान, धर्मवीर चित्रपटाचं ट्रेलर नुकलाच लॉन्च करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर सलमान खान ने देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याआधी या चित्रपटाचं होर्डींग आशियातील सर्वोत मोठ्या होर्डींगवर लागलं आहे. त्यामुळे हा चित्रपट किती रूपयांचा गल्ला जमवतो. ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे. मात्र निलेश राणे यांनी केलेली टिका शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
Read also:
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी