पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महामारीच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या वाढ होत असताना, मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केलं. तसेच, पालिकेने व्यवस्थापन कसे केले, याचे पालिका अधिकाऱ्यांकडून धडे घेण्याची सूचना देखील सुप्रीम कोर्टाने केंद्र तसंच दिल्ली सरकारला केली. तसेच नीती आयोगाने देखील ठाकरे सरकारच्या ‘मुंबई मॉडेल’ची दखल घेतल्याने, राज्य सरकरच्या ‘मुंबई मॉडेल’ ची देशभरात चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, आघाडी सरकारच्या या ‘मुंबई मॉडेल’वर एकीकडे स्तुतीसुमनांचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षाकडून मात्र यावर टीकेचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्विट करत, “ठाकरे सरकारचा हे ‘मुंबई मॉडेल’ निव्वळ खोटारडेपणा असून, ठाकरे सरकार मुंबईतील बाधित रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून तेथील बाधित रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे.
Is the so called #MumbaiModel all about transferring patients to Pune n other cities ??
Many tell me..Once some1 gets positive in Mumbai..he/she receives follow up calls from Pune covid war room..
That’s how the numbers r reduced for the sake of PR n a fake Mumbai Model?— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
तसेच, कित्येक लोकांनी याबद्दल मला माहिती दिली. मुंबईत एखादी व्यक्ती महामारीने बाधित झाली; की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे दर्शवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
“Transferring” means the patient is still in Mumbai but shown as a Pune patient to reduce the Mumbai numbers..No wonder other cities have high numbers n Mumbai is at its lowest!!
Full Golmaal!!— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
Read Also :
- एकनाथ खडसे आणि नितीन गडकरींचे झाले एकमत…
- परमबीर सिंग यांची एसीबीकडून चौकशी सुरु, चौकशीत तथ्य आढळ्यास…
- पुण्यात उभारणार ‘चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटल’, 2 कोटींचा महापौर विकास निधी मंजूर
- ‘अशी दुटप्पी भूमिका सरकार कसे घेऊ शकते ?’ कोरोनारुग्ण संख्येवरून संदीप देशपांडेंची टीका
- ‘मुंबईप्रमाणे पुण्यातही जेष्ठ, दिव्यांग नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन पध्दतीने लसीकरण करावे’