मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार, अशी आंदोलनामागची भूमिका भाजपने सांगितली.
दरम्यान, नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी, फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरादार हल्ला चढवला. विशेष करून त्यांनी काँग्रेसला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. “ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे,” असं म्हणत त्यांनी, “माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिलीत, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,” अशी सिंहगर्जना फडणवीसांनी केली.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी!
कारण त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्या धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे. pic.twitter.com/k0Jwpy4Ipq— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 28, 2021
यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी, “फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील, तर मी स्वत: त्यांची भेट घेईन”, असा टोला लगावला, यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
राऊतांनी फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, ते सध्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचीच जास्त चिंता करत आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्याच धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे,” असं ट्विट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- हिंगोली मतदारसंघातील जलसिंचनाची कामे तातडीने पूर्ण करा – खासदार हेमंत पाटील
- “लेकीनेही बापाच्या कामाचा विचार करून, त्याच्या कामाची जाण ठेवली पाहिजे”
- संजय राऊतांची ही सवयच, “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- ‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका