मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारकडून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पावले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतल्या ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या “माझा डॉक्टर” या मोहिमेवरून आता भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असला किळसवाणा प्रकार असल्याचे म्हणत बोचरी टीका केली.
“सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं” हे मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असला किळसवाणा प्रकार आहे.
मी कडी लावून घरातच बसणार तुम्ही मैदानात उतारा अशी ही मानसिकता. pic.twitter.com/O4FBykiiVK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 9, 2021
“सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं” हे मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असला किळसवाणा प्रकार आहे. मी कडी लावून घरातच बसणार तुम्ही मैदानात उतारा अशी ही मानसिकता आहे, अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. फॅमिली डॉक्टरांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी मैदानात उतरावे असे आवाहन त्यावेळी त्यांनी केले.
Read Also :
- पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना
- महामारी, तिसरी आघाडी आणि काँग्रेसवर संजय राऊतांचे मोठे भाष्य, म्हणाले…
- ‘ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री, एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती!’, भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लबोल