अमरावती : महाड मध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, मुख्यमंत्र्याच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यांनतर राणेंनी आपल्या विरोधातील सर्व गुन्हे रद्द व्हावेत आणि कोणतीही कारवाई केली जाऊ नये, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर, न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना- भाजपच्या वादाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हे मजा घेत आहेत – सदाभाऊ खोत
दरम्यान, राणेंच्या अटकेपासून-सुटकेपर्यंत राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी भाजप पक्ष कार्यालये फोडली, जाळली. तसेच, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. महामार्ग बंद करण्यात आले होते. यांनतर आजच्या दिवशीही दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
“जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे”, अशी आक्रमक भूमिका आता भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. ते २ दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, “यापुढे अश्या गंभीर घटना घडल्यास, भाजप मागेपुढे पाहणार नाही, आमच्याकडून थेट ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्यात येईल,” असा इशारा शिवसेना आणि शिवसैनिकांना दिला.
एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
दुसरीकडे, २५ ऑगस्टला राणेंनी, त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, दोन्ही निकाल माझ्याच बाजूने लागले आहेत. याचाच अर्थ देश कायद्याने चालतो,” असं म्हणत, “दोन दिवसांच्या कालावधीनंतर, जन आशीर्वाद’ यात्रा सुरूच ठेवणार! असं ठणकावून सांगितलं. या पार्श्वभूमीवर आज त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल केले गेले आहे, अशी माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा शिवसेना-राणे संघर्ष पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
Read Also :
- सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
- राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत
- “राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
- केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
- “आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”