सोलापूर : भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे आज, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून घोंगडी बैठकांसाठी, सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यांनी, श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना, “काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनेक ओबीसी नेते आहेत. या आघाडी सरकारमध्ये ते असतानाही का त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले नाही? धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांना का प्रदेशाध्यक्ष केले गेले नाही?, असे सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केले आहेत.
कन्येने दिले उत्तर, “पात्रता पेक्षा जास्त मिळालं की असं होतं”; आता पडळकरांचे प्रत्युत्तर
यावेळी, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे, याचिकाकर्ते, विकास गवळी हा काँग्रेसचेच कार्यकर्ता आहे. तो स्वत: काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्याचे वडील काँग्रेसचे आमदार होते, असे पडळकर यांनी ट्विट करून सांगितले आहे. दरम्यान, विकास किसनराव गवळी यांनीही, आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणारा, स्वत:च आपण असल्याचे, तसेच आपण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीही असल्याचे सांगितले आहे.
आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते, थोरातांच्या कन्येची पडळकरांवर टीका
तसेच, आपलं नाकर्तेपणाचं पाप झाकण्यासाठी, फक्त खोटी बोंबाबोंब करायची, हा ‘बहुजन द्वेष’ ह्यांचा डीएनए आहे. आघाडी सरकारने गेल्या १५ महिन्यात काही केलं नसल्यानेच हे आरक्षण रद्द झाले. हे आरक्षण टिकवण्यासाठी ‘सेन्सस डेटा’ नाही, तर ‘इंपेरिकल डेटा’ तयार करायला न्यायालयाने सांगितले आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट न वाचताच राज्य सरकार, केंद्र आणि तत्कालीन भाजप सरकारवर आरोप करत आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!
- पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांचा खोटारडेपणा अखेर उघड; त्या बैठकीचे निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना, महापौर काय झोपा काढत होते का?