मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. तसेच, पुन्हा एकदा केंद्राकडून राज्यांना लसीचा पुरवठा केला जाणार आहे. यावर आता विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला’, असे म्हटले होते. यावरून आता भाजप आमदार राम सातपुते यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींच्या मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, स्वतंत्र भारतातील प्रत्येक सरकारने देशातील प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मोफत लसीकरण केलं. मात्र कोरोना लसीकरणात या धोरणापासून केंद्र सरकारने फारकत घेतली होती. पण उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे. यासंदर्भात मी सुप्रीम कोर्ट, केंद्रातील विरोधी पक्षातील नेते आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री या सर्वांचे आभार मानतो!
रोहित पवारांच्या या ट्विटनंतर आता राम सातपुते यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यांनी काय दिवे लावले ? असा सवाल त्यांनी केला.
शरदजी पवार साहेबांच्या मागणीला यश वगैरे असं ट्विट करा. म्हणजे जरा वातावरण निर्मिती होईल लसीकरणापूर्वी. महाराष्ट्रात आपलं सरकार आहे काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने ?, असा खोचक सवाल सातपुते यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
Read Also :
- पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘त्या’ निर्णयासाठी देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- ‘शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली’
- पुणे : रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
- ‘आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊनही नको’