नवी दिल्ली : लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी निशाणा त्यांच्यावर निशाणा साधला. मोफत लसीकरण आहे, तर मग खासगी रुग्णालय पैसे का आकारत आहेत ? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
One simple question-
If vaccines are free for all, why should private hospitals charge for them? #FreeVaccineForAll
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2021
राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत ट्विट केले की, एक साधा प्रश्न आहे. जर लसीकरण सर्वांसाठी मोफत आहे, मग खासगी रुग्णालय यासाठी पैसे का घेत आहेत ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीमेवरून केंद्र सरकारवर टीका होत होती. अनेक राज्यांना मुबलक प्रमाणात लस पुरवठा होत नव्हता. यामुळी लसीकरणाचा वेग देखील मंदावला होता. आता अखेर केंद्र सरकारच राज्यांना लस पुरवणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.
Read Also :