कोल्हापूर : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
दरम्यान, यावरून राज्यात राजकारण पेटले असून, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून शिवसेना भवनासमोर अभूतपूर्व असा राडा झाला. तसेच, शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये देखील यावरून वाक्युद्ध सुरु आहे. यातच आता, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून, राम मंदिर जनतेसाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी लोकांकडून निधी गोळा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे, लोकांच्या श्रद्धेला तडा गेला असून, त्यांच्या मनात संशय बळावला आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रीय सेवक संघ व केंद्र सरकारने याबाबत खुलासा केला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली आहे.
हे पण वाचा, ‘रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी रचण्यात आलेले हे राजकीय षडयंत्र’, ट्रस्टने फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप
“राम मंदिराचा आणि माझा जवळचा संबंध असून, कागलमध्ये अयोध्येच्या राम मंदिराआधी मी एक मंदिर उभे केले आहे. माझा जन्मसुद्धा रामनवमीचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी देखील हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी ट्विट करून हा विषय समाज माध्यमांवर उपस्थित केल्यानंतर, त्यांच्या प्रतिमेला जाहीररीत्या काळे फासणे किंवा शिवसेना भवनावर चाल करून जाणे, हे एक पक्ष म्हणून त्यांना शोभाणारं नाही. याबाबत दोन्ही शंकराचार्यांनीही शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे या सर्व बाबतीत स्पष्टीकरण मिळणे गरजेचे आहे,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
Read Also :
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
- महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी, मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक होणार एक सदस्य प्रभाग पद्धतीनं?
- सरकार तुमचे ऐकते मग आंदोलन कशाला? संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू!
- ‘…म्हणून रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी’
- मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे