मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या, “केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी,” या मागणीवरून राज्य सरकारवर टीका करताना, “राज्य सरकारने काही झालं की ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर केंद्राने करायच्या असतील तर, राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, अशी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावरून नवाब मलिक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, भाजपकडून नवाब मलिकांच्या या टीकेचा समाचार घेण्यात आला असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, “माशा मारण्याचा अर्थ कदाचित मलिक साहेबांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत”, अशी जोरदार टीका केली आहे.
आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात?
१० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत?
बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 15, 2021
तसेच, “आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!”, असा टोला देखील त्यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांवर पलटवार करताना, “फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!”, असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
Read Also :
- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतके काम कोणत्याच नेत्याने केले नाही – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार गोपीचंद पडळकराचे यांचे पत्र
- अनेक वादळं येतील जातील, आधी देशातले महामारीचे वादळ थांबवा
- ‘सत्ताधारी असूनही अशोक चव्हाणांना टीकेचीच सवय’
- फडणवीसांचा नवा डाव, ना मोदी ना पवार थेट लिहिले सोनिया गांधींना पत्र