पुणे : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यात कंबर कसली आहे. राज्यात झालेल्या पक्ष फुटीचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून भाजपने यासाठी मोठी रणनिती आखण्यात सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणुक प्रमुखांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर विसंबून न राहता भाजपने वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच आता २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी उत्न इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण वर्ग आयोजित केलं आहे. या प्रशिक्षण वर्गात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यासंह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते निवडणुक प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
दरम्यान, राज्यात मागील काही घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. पक्ष फुट प्रकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विविध संघटनांचे मोर्चे, तसेच राज्यातील इतर घटना यातून आगामी निवडणुकीत पक्षावर काही परिणाम होणार नाही ना. तसेच यातून योग्य मार्ग काढून भाजपला आगामी निवडणुकीत सकारात्मक भूमिकेत आणण्यासाठी भाजप या विशेष प्रशिक्षण शिबीरातून मार्ग काढण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार, मराठा समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
हेही वाचा…“बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर…” वडेट्टीवारांचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादी नेमकी कुणाची ? निवडणुक आयोगात होणार फैसला, सुनावणीसाठी शरद पवार अन् अजित पवार राहणार उपस्थित
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा